मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लाॅकडाऊनमध्ये सूट कोणाकोणाला? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना शासनामार्फत जारी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लाॅकडाऊन जाहीर केला. त्यानंतर केंद्रीय गृहसचिवांनीही सूट मिळणाऱ्या गटांची, संस्थांची यादी जाहीर केली. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.  1. किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये 2.  किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या 3.  मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे 4. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्...
अलीकडील पोस्ट

जनता कर्फ्युला अारगकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जनता कर्फ्यु अारग

महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक

संतोष माने SM News: नमस्कार शेतकरी बांधवांनो... महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे; ऑक्टोबर 2019 करिता, राञी 23:30 ते सकाळी 9:30  सकाळी 9:30 ते सायंकाळी 17:30  नोव्हेंबर 2019 करिता, राञी 21:30 ते सकाळी 7:30  सकाळी 9:30 ते सायंकाळी 17:30 डिसेंबर 2019 करिता,  राञी 22:25 ते सकाळी 08:25  सकाळी 09:55 ते सायंकाळी 17:55 असे राहिल. टीप: शेतीचे हे वेळापञक फक्त कवठेमहांकाळ विभागापुरते (मल्लेवाडी, आरग, लिंगनूर, सलगरे, बेळंकी) मर्यादित आहे.          लाईट यावेळेत चालू राहील. कृपया ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे...          हा मेसेज जास्तीत जास्त फाॅरवर्ड करा...

My Home Ganesh 2019

पैलवान ओंकार काटकर बनला पहिला 'आरग केसरी'

          आरग ता. मिरज येथे हनुमान जयंतीनिमित्त किसान क्रांती व्यायाम मंडळ आरग यांचेवतीने दिनांक 03 जून 2019 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते. तसेच चालू वर्षीपासून "आरग केसरी" हा मानाचा खिताब व मानाची चांदीची गदा हा पुरस्कार चालू केला आहे.                          यावर्षी या गदेसाठी पै. ओंकार काटकर, आरग विरूद्ध पै. श्रेयस कांबळे, कोल्हापूर यांचेमध्ये सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या लढतीत पै. ओंकार काटकर याने विरोधी पै. श्रेयस कांबळे यांस एकचाक या डावाने मात केले. तसेच इंटरनॅशनल चॅम्पीयन पै. सूरज शेंडगे यांनी विरोधी पै. यशवंत थोरात यांस कलाजंग या डावाने मात केले. सदर कुस्ती स्पर्धा चिंतामणी मठाच्या ग्राऊंडवर भरवण्यात आल्या होत्या. 

सांगली येथे पार पडला आगळावेगळा शिवविवाह सोहळा

सांगली येथील शिवश्री राहुल रामचंद्र चव्हाण व इचलकरंजी येथील शिवमती स्नेहा अरविंद शेलार यांचा आज 14 मे 2019 रोजी छञपती संभाजीराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवधर्म पद्धतीने शिवविवाह सोहळा भिडे मंगल कार्यालय सांगली येथे पार पडला. शिवधर्म पद्धतीने केल्या जाणार्‍या शिवविवाहात कोणत्याही प्रकारचा कर्मकांड केला जात नाही. हुंडा दिला वा घेतला जात नाही. अक्षता म्हणून तांदूळ वापरून त्याची नासाडी व अन्नाचा अपमान केला जात नाही. त्याऐवजी फुले देऊन नवदांपत्यास शुभ आशिर्वाद दिले जातात. अक्षता म्हणून जो तांदूळ पायाखाली तुडवून त्याची नासाडी होणार होती, तोच 40 किलो तांदूळ या नवदांपत्याच्या हस्ते अंधआश्रमाला दान देऊन आपले सामाजिक भान जपले. या शिवविवाह सोहळ्यास आरग येथील शिवश्री गणेश पोपट पाटील व शिवश्री भास्कर पाटील यांनी शिवसेवक म्हणून काम पाहिले. शिवविवाहाची सुरूवात सामूहिक जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. शिवधर्म पद्धतीनुसार नवदांपत्याकडून शपथविधी करवून घेण्यात आला. मंगलाष्टका ऐवजी शिवअष्टका गायल्या. अशा रितीने हा आगळावेगळा सोहळा आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. Follow Us On Our Social L...

आरगेच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे

आरग ता. मिरज येथील ओम मनोज बुरूड, अथर्व विनायक कोळी व विशाल कोरे (माळी) या तीन मुलांनी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत स्केटींग या खेळप्रकारात सुवर्णपदक पटकावून आरगेच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे रोवले. याबबतचा सविस्तर वृतांत असा, Ministry Of Youth Affairs & Sports Government Of India, Member Of International Olympic Committee India यांची मान्यताप्राप्त असलेली National Sports Organization Committee तर्फे भरवण्यात आलेल्या 2nd International Champion Games Cup 2019 या स्पर्धा Agnel Sports Ground गोवा येथे दिनांक 5 मे ते 7 मे 2019 यादरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत आरग येथून कु.   ओम मनोज बुरूड, अथर्व विनायक कोळी व विशाल कोरे (माळी) या तीन मुलांनी स्केटींग या खेळप्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी ओम मनोज बुरूड याने Under 10 या वयोगटात 500/300 मीटरचे 30/20 राउंड पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तसेच अथर्व विनायक कोळी व विशाल कोरे या मुलांनीदेखील प्रत्येकी 1-1 सुवर्णपदक मिळविले. तसेच सांगली येथील आयुषी उदय पाटील, हर्षवर्धन उदय पाटील आणि वेदांत बरगाले हे ...