आरग ता. मिरज येथील ओम मनोज बुरूड, अथर्व विनायक कोळी व विशाल कोरे (माळी) या तीन मुलांनी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत स्केटींग या खेळप्रकारात सुवर्णपदक पटकावून आरगेच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे रोवले.
याबबतचा सविस्तर वृतांत असा,
Ministry Of Youth Affairs & Sports Government Of India, Member Of International Olympic Committee India यांची मान्यताप्राप्त असलेली National Sports Organization Committee तर्फे भरवण्यात आलेल्या 2nd International Champion Games Cup 2019 या स्पर्धा Agnel Sports Ground गोवा येथे दिनांक 5 मे ते 7 मे 2019 यादरम्यान पार पडल्या.
या स्पर्धेत आरग येथून कु. ओम मनोज बुरूड, अथर्व विनायक कोळी व विशाल कोरे (माळी) या तीन मुलांनी स्केटींग या खेळप्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी ओम मनोज बुरूड याने Under 10 या वयोगटात 500/300 मीटरचे 30/20 राउंड पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
तसेच अथर्व विनायक कोळी व विशाल कोरे या मुलांनीदेखील प्रत्येकी 1-1 सुवर्णपदक मिळविले. तसेच सांगली येथील आयुषी उदय पाटील, हर्षवर्धन उदय पाटील आणि वेदांत बरगाले हे विद्यार्थीही स्पर्धेत सहभागी होते. यांनीही प्रत्येकी 1-1 सुवर्णपदक मिळविले.
स्पर्धेहून घरी परतल्यानंतर या तीनही सुवर्णपदक विजेत्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे जंगी स्वागत व सत्कार श्री.मनोज महादेव बुरूड, मोरेश्वर मंडळ आरग व इतर मान्यवर लोकांनी केले. तसेच सर्वच स्तरातून या मुलांवर शुभेच्छांचा व कौतुकाचा आशिर्वादरूपी वर्षाव होत आहे.
या मुलांना स्केटींग हा खेळप्रकार शिकवण्यासाठी सांगली येथील स्केटींगचे शिक्षक श्री. उदय पाटील सर व सौ. प्रतिक्षा पाटील मॅडम यांनी भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचाही पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी सर्वच मुलांनी खूप मेहनत घेतली होती.

👍👍
उत्तर द्याहटवा