Santosh Mane SM News: आरग ता. मिरज येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी होणार्या पालखी मिरवणुकीत गावातील सर्व शिवप्रेमी तरूण व विविध मंडळे सहभागी होऊन अनेक ठिकाणी छञपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. सायंकाळी 04:00 वाजता शिवमुद्रा ढोल-ताशा पथक आरग यांची भव्य मिरवणूक होणार आहे. तसेच मोरेश्वर शिवजयंती महोत्सव, आरग या मंडळाच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 ते 12:00 निबंध स्पर्धा यामध्ये लहान गट, मोठा गट, तसेच रांगोळी स्पर्धा, घरोघरी शिवजयंती सणांप्रमाणे साजरी व्हावी यांसाठी शिवप्रतिमा सजावट स्पर्धा व सायंकाळी 07:00 ते 08:00 व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच दुपारी 12:00 ते 03:00 महाप्रसादाचे आयोजनही केले आहे. तसेच छञपती सोशल फौंडेशन आरग यांचेवतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05:00 वाजता लहान ...