मुख्य सामग्रीवर वगळा

आरग ता. मिरज येथे शिवचरिञकार ह.भ.प. गंगाधर महाराज कुरूंदकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न

संतोष माने SM News:
        आरग ता. मिरज येथे संत गाडगेमहाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 09.00 वा. विठ्ठल मंदिर, आरग येथे प्रसिद्ध शिवचरित्रकार ह.भ.प.गंगाधर महाराज कुरुंदकर(हिंगोली) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. किर्तनासाठी आरग गावातील तरूण मंडळी, मोठी माणसे व स्ञियां भरपूर संख्येने हजर होत्या.
         किर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरा इतिहास पोहचवण्याचे काम महाराज करत आहेत. किर्तनाची सुरवात करताना महाराजांनी
बहुजन समाजासाठी ज्या-ज्या महामानवांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्या-त्या सर्व महामानवांना प्रथमत: अभिवादन केले.  त्यानंतर त्यांनी छञपती शिवाजी महाराज तुकोबारायांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा राजांनी तुकाराम महाराजांसाठी मूल्यवान रत्ने, जवाहिरात भेट म्हणून आणली होती. राजांनी आणलेल्या भेटवस्तू तुकाराम महाराजांनी नाकारल्या व या वस्तू स्वराज्याच्या कामी लावा, स्वराज्याचे सुराज्य करा. दिलेली आश्वासने पूर्ण करा असे सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून शिवबांना जो उपदेश दिला त्या अभंगावर गंगाधर महाराजांनी संपूर्ण किर्तन केले. तो अभंग असा;

आम्ही तेणे सुखी | म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥1॥
तुमचे येर वित्त धन | ते मज मृत्तिकेसमान॥2॥
कंठी मिरवा तुळशी | व्रत करा एकादशी॥3॥
म्हणवा हरीचे दास | तुका म्हणे मज हे आस॥4॥
         
      महाराज आपल्या किर्तनात अनेक विषयांवर बोलले. अगदी बळीराजापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत व तुळशीच्या लग्नापासुन ते संभाजी राज्यांच्या हत्येपर्यंतचा सर्व खरा इतिहास सांगितला. शेतकर्यांच्या व्यथा, स्वामीनाथन कृषी आयोग याबद्दल जागृत केले. लोकांना जागृत करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. आपले बहुजन महापुरूष जगापर्यंत पोहचवायचे असतील तर त्यांची जयंती-पुण्यतिथी ही तिथीप्रमाणे न साजरी करता तारखेप्रमाणे केली पाहिजे, असे महाराजांनी सप्रमाण पटवून दिले. 'वारकरी' नावाच्या दिनदर्शिकेमध्ये सर्व बहुजन महामानवांच्या जन्मतारखा ह्या तारखेप्रमाणे दिलेल्या आहेत. अशी दिनदर्शिका त्यावेळी भरपूर लोकांनी विकत घेतली. 'पुस्तकाने मस्तक सुधारते व जे मस्तक सुधारलेले असते ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही' त्यामुळे वाचन करा. खरा इतिहास वाचा, कारण 'वाचाल तर वाचाल'. खरा इतिहास समजून घेण्यासाठी शिवश्री विकास पाटील यांनी 'प्रबोधन एक्सप्रेस' नावाची पुस्तकांचा स्टाॅल असलेली गाडी आणली होती.
        किर्तन साधारणतः 03 तास चालले. किर्तनाचा शेवट विठ्ठलाची व तुकाराम महाराजांची आरती होऊन करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Santosh Mane SM News जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... आईच्या आईपणाला.. तिच्यातील बाईपणाला.. तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना.. त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना.. बायको नावाच्या अर्धांगिनीला.. तिच्यात दडलेल्या कारभारणीला.. संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला. दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला.. सख्या, चुलत, मावस बहिणीला.. बहिणी सारख्या प्रिय वहिनीला.. त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला.. माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला.. मावशी,आत्याला आणि मामीला.. त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला.. आज्जीच्या संस्कार सृष्टीला.. तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला.. घरच्या आणि शेजारच्या काकूला.. सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला.. मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या.. विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या.. भूत, वर्तमान, भविष्यकाळी रणरागिनींना.. तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा...

शिवरायांचा वारसा

Santosh Mane SM News Arag:   शिवरायांचा वारसा (खास दिपावलीच्या निमित्ताने)                        नदीचा उगमस्थान कुणी कुणी पाहिलाय. केवढा असतो हो नदीचा उगमस्थान. अगदी छोटासाच झरा असतो. हो ना? पण नदी किती मोठी असते. खूप मोठी असते ना! मग नदीचा उगम इतका छोटा आणि नदी एवढी मोठी! कसं काय बरं शक्य आहे? नदी मोठी असण्याचं एकच कारण आहे. कारण नदी स्वतःमध्ये अनेक झरे मिसळून घेते. अनेक छोटे-मोठे झरे मिसळून घेत-घेत नदी दिसेल त्या मार्गाने पुढे-पुढे जातच असते. मग त्या वाटेवर कुणी आडवं आलं तर ती त्यालाही सोबत घेते. जर सोबत नाही घेता आलं तर त्याच्या नादाला न लागता आपला मार्ग बदलते, माञ ध्येय नाही बदलत. अनेक अडचणींना सामोरे जात नदी शेवटी समुद्रामध्ये सामावते.         तसंच आपल्या मनातील विचारांचं आहे. आपल्या मनात शेकडो विचार घोळत असतात. काही चांगले तर काही वाईट. त्यातीलच एखादा चांगला विचार समाजामध्ये बदल घडवणारा असतो. त्या एका चांगल्या विचाराला योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली कि त्या विचाराचे एका चांगल्या संकल्...

महावितरण शेतीच्या लाईटचे बदललेले वेळापत्रक

संतोष माने SM News: नमस्कार शेतकरी बांधवांनो. .. महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे; मार्च 2018 करिता; राञी 11:55 ते सकाळी 09:55 सकाळी 09:55 ते सायं. 05:55 एप्र...