Santosh Mane SM News Arag:
शिवरायांचा वारसा
नदीचा उगमस्थान कुणी कुणी पाहिलाय. केवढा असतो हो नदीचा उगमस्थान. अगदी छोटासाच झरा असतो. हो ना? पण नदी किती मोठी असते. खूप मोठी असते ना! मग नदीचा उगम इतका छोटा आणि नदी एवढी मोठी! कसं काय बरं शक्य आहे? नदी मोठी असण्याचं एकच कारण आहे. कारण नदी स्वतःमध्ये अनेक झरे मिसळून घेते. अनेक छोटे-मोठे झरे मिसळून घेत-घेत नदी दिसेल त्या मार्गाने पुढे-पुढे जातच असते. मग त्या वाटेवर कुणी आडवं आलं तर ती त्यालाही सोबत घेते. जर सोबत नाही घेता आलं तर त्याच्या नादाला न लागता आपला मार्ग बदलते, माञ ध्येय नाही बदलत. अनेक अडचणींना सामोरे जात नदी शेवटी समुद्रामध्ये सामावते.
तसंच आपल्या मनातील विचारांचं आहे. आपल्या मनात शेकडो विचार घोळत असतात. काही चांगले तर काही वाईट. त्यातीलच एखादा चांगला विचार समाजामध्ये बदल घडवणारा असतो. त्या एका चांगल्या विचाराला योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली कि त्या विचाराचे एका चांगल्या संकल्पनेत रूपांतर होते आणि त्या संकल्पनेला कल्पकतेची जोड मिळाली कि त्याचा समाजहितासाठी वापर करता येतो. उदाहरणच पाहायचं झाल्यास शिवरायांनी निर्माण केलेलं रयतेचं स्वराज्य बघा.
स्वराज्याची संकल्पना
स्वराज्याची संकल्पना
शहाजीराजांच्या मनात एक विचार आला कि, आदीलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही यांच्या जाचातून जर रयतेला मुक्त करायचं असेल तर रयतेचं स्वराज्य निर्माण व्हायला हवं. त्यांनी तो विचार जिजाऊंना सांगितला आणि स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने छञपती शहाजीराजे व राजमाता जिजाऊ हेच स्वराज्य संकल्पक आहेत. त्यांनी हीच संकल्पना बालशिवबांच्या मनात रूजवली. त्यांच्यावर लहानपणापासूनच अशाप्रकारचे संस्कार केले. माॅसाहेब जिजाऊंनी शिवरायांना अनेक भाषांमध्ये पारंगत केले. शिवाजीराजांना आठ भाषा येत होत्या. जिजाऊंनी शिवबाला गोरगरीब रयतेचं दुःखाचं कारण सांगितलं. रयत दुःखी आहे, यवनांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना ञासली आहे. या रयतेला यवनांच्या गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना त्यांचं स्वतःचं राज्य म्हणजेच स्वराज्य निर्माण करून द्यावं, जिथं प्रत्येकाला समान वागणूक असेल, असं राज्य निर्माण व्हायला हवं असं बालशिवबांना वाटू लागलं. मग त्यांनी हा विचार, ही संकल्पना आपल्या बालसवंगड्यांना सांगितली. बघता बघता एक-एक माणूस स्वराज्याशी जोडला जाऊ लागला आणि स्वराज्यासाठी रक्त सांडायलाही मागे-पुढे न पाहणारी मावळ्यांची एक मोठी फौजच तयार झाली. स्वराज्यासाठी, शिवाजीराजांसाठी प्राण न्योच्छावर करणारे मावळे तयार झाले. अन् याच एका छोट्याशा विचारातून, याच एका छोट्याशा संकल्पनेतून एक मूर्तिमंत असं स्वराज्य निर्माण झालं. हे स्वराज्य म्हणजे फक्त राजा आणि प्रजा, मालक आणि गुलाम असं नव्हते, तर प्रत्येक रयतेला, प्रत्येक मावळ्याला हे स्वराज्य म्हणजे आपलं घरंच आहे असं वाटायचं आणि असं वाटणं स्वाभाविकच होतं. कारण शिवाजी महाराज जरी राजे असले तरी ते रयतेवर कधीच हूकूम गाजवायचे नाहीत. रयतेचे कल्याण, रयतेची काळजी कोणत्या गोष्टींमध्ये आहे अशाच गोष्टींना ते प्राधान्य देत. राजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती कि, 'शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, जो काही व्यवहार करावयाचा असेल तो रोखीने करा, सार्वजनिक पाणवठ्यावरील पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. वृक्षतोड करू नका, जर लाकूडफाटा हवा असेल तर एखादं जीर्ण झालेलं झाड तोडा पण त्या ठिकाणी दुसरं झाड लावा'. या व अशासारख्या प्रजेच्या कल्याणाच्या कितीतरी आज्ञा शिवाजीराजांनी आपल्या सैन्याला दिल्या होत्या.
शिवाजी महाराजांची इतर धोरणे
शिवाजी महाराज हे आपल्याला फक्त युद्ध, गड, किल्ले, लढाया एवढ्यासाठीच माहित आहेत. इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी शिवाजीराजांचं खरं काम आपल्याला कधीच नाही शिकवलं. छञपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, अर्थविषयक धोरण, आरमार, धार्मिक धोरण, राजकीय धोरण, समाजकारण, भाषाशास्ञ, यासारख्या कित्येक कलामध्ये निपून असणारे राजे आपणाला नाही शिकविले. शिवाजीराजांचा या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय दुरदृष्टीचा होता. राजे कोणताही निर्णय घेताना खूप पुढचा विचार करत असत. मगच निर्णय घेत. एखादी गोष्ट जर रयतेसाठी , समाजासाठी घातक असेल तर ती गोष्ट शिवाजीराजे कटाक्षाने टाळायचे आणि एखाद्या गोष्टीमध्ये रयतेचं कल्याण असेल तर ती गोष्ट कितीही महाग असेल, कितीही अडचणी असल्या तरी शिवाजीराजे ती गोष्ट केल्याशिवाय राहत नव्हते.

महाराजांनी सुरत जिंकली (लुटली नाही)
काहीकाही समाजकंटक छञपती शिवाजी महाराजांना लुटारू, दरोडेखोर ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात कि छञपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. पण हे साफ खोटं आहे. शिवाजी राजांनी सुरत लुटली नाही तर जिंकली. कारण ती संपत्ती आपल्याच बहुजन समाजातील रयतेची होती. वेगवेगळ्या करांमधून गरीब रयतेकडून लुटलेली संपत्ती शिवाजी राजांनी सुरत जिंकून परत आणली व त्याचा उपयोग रयतेच्या कल्याणासाठी केला. विविध धरणे बांधली, पाण्यासाठी विहिरी बांधल्या. पण आपल्या राजांना बदनाम करण्यासाठी शिवाजी राजांना दरोडेखोर ठरवणारे समाजकंटकदेखील अजूनही या भूतलावर आहेत, याचीच खंत वाटते.
स्वराज्याचे आधारस्तंभ किल्ले
शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी व त्यांचा विस्तार करण्यासाठी किल्ल्यांचे किती महत्व आहे, हे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या उभ्या हयातीत जवळपास तीनशेच्यावर किल्ले बांधले व त्यांची डागडुजी केली. परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव नाही दिले. खर्या अर्थाने शिवाजी महाराज हे स्थापत्यतज्ञ होते. त्यांनी बांधवून घेतलेली सर्वच्या सर्व किल्ले अजूनही सुस्थितीत आहेत. (काहींचा अपवाद वगळता)
प्रबोधनकार के.सी. ठाकरे म्हणतात कि, 'शिवाजी राजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे कि, त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्यापुढं 33 कोटी देवांची फलटणही बाद होते'. मग आपण विचार करायला पाहिजे कि हम किस खेत कि मूली है.
छञपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या छोट्याशा काळात त्यांनी इतकं महान कार्य केले आहे कि, त्यांच्या विचारांचा अभ्यास करून आमच्या एक नाही, दोन नाही तर तब्बल शेकडो पिढ्या आपला व आपल्या समाजाचा विकास व प्रगती करू शकतील. पण त्यासाठी छञपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास समाजासमोर येणे गरजेचे आहे.
आपण आतापर्यंत जो इतिहास शिकलो तो प्रतिगामी चळवळीतील लोकांनी, त्यांना अनुरूप लिहिलेला आहे. सर्व सत्ता त्यांच्याच हातात असल्याने आपण, त्यांनीच शिकवलेला इतिहास शिकत आलोय. पण आता आपल्या बहुजन समाजातील कित्येक लोक अभ्यास करून, वाचन करून, विचार करून सत्य इतिहास शोधून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपला बहुजन समाज झोपला होता, तो आता जागा होत आहे, वाचन करत आहे, विचार करत आहे आणि अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्यासाठी समर्थ झाला आहे.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय भारत.

संतोष माने, आरग. Mo. +919595265612
Follow Me;
On YouTube
Santosh mane, Arag
SaNam Arag
https://www.yotube.com/santoshmanearag
https://www.yotube.com/santoshmanearag
On Facebook
https://www.facebook.com/
santhosh.mane7652
On Instagram
https://www.instagram.com/santhosh7652
मस्त...
उत्तर द्याहटवा