Santosh Mane SM News:
आरग ता. मिरज येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी होणार्या पालखी मिरवणुकीत गावातील सर्व शिवप्रेमी तरूण व विविध मंडळे सहभागी होऊन अनेक ठिकाणी छञपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
सायंकाळी 04:00 वाजता शिवमुद्रा ढोल-ताशा पथक आरग यांची भव्य मिरवणूक होणार आहे.
तसेच मोरेश्वर शिवजयंती महोत्सव, आरग या मंडळाच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 ते 12:00 निबंध स्पर्धा यामध्ये लहान गट, मोठा गट, तसेच रांगोळी स्पर्धा, घरोघरी शिवजयंती सणांप्रमाणे साजरी व्हावी यांसाठी शिवप्रतिमा सजावट स्पर्धा व सायंकाळी 07:00 ते 08:00 व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच दुपारी 12:00 ते 03:00 महाप्रसादाचे आयोजनही केले आहे.
तसेच छञपती सोशल फौंडेशन आरग यांचेवतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05:00 वाजता लहान गट व 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05:00 वाजता मोठा गट स्पर्धा होणार आहेत.
तसेच सत्यशोधक जागृती विचार मंच, व आरगमधील इतर सर्व संघटनांच्या वतीने 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी "तुकोबा निघाले वैकुंठाला?" या शाहीर रा. राजा पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, तसेच व्याख्यान व शाहीर राजा पाटील यांचा पोवाडाही सादर होणार आहे.
तरी सर्व आरगवासीयांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
टीप: घरी शिवजयंती साजरी केल्यावर #घरोघरी_शिवजयंती या हॅशटॅगवर सोशल साईटवर फोटो अपलोड करावेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा