मुख्य सामग्रीवर वगळा

आरग ता. मिरज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

संतोष माने SM News:
            आरग येथे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरग गावातील विविध मंडळाच्या शिवप्रेमी तरूणांनी सकाळी 09 वाजता एकञ येऊन शिवाजी राजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून जिजाऊ वंदना म्हणून शिवाजी राजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढली.
              दिनांक 16 व 17 रोजी छञपती सोशल फौंडेशनच्या वतीने लहान व मोठ्या गटाच्या वक्तृत्व स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धांना स्पर्धकांचा उत्साह भरपूर होता. वक्तृत्व स्पर्धांचे प्रमुख उद्घाटक म्हणून माजी आमदार शरद पाटील सर व अभिजित (दादा) हारगे उपस्थित होते.
       तसेच मोरेश्वर शिवजयंती महोत्सव आरग येथे महिलांनी शिवरायांचा पाळणा म्हणून व जिजाऊ वंदना म्हणून शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तसेच रांगोळी स्पर्धा, लहान गट व मोठा गट निबंध स्पर्धा, तसेच "शिवराय मनामनात...शिवजयंती घराघरात..." हे ब्रिद ठेवून शिवरायांची जयंती घराघरात एखाद्या सणाप्रमाणे साजरी व्हावी यासाठी शिवप्रतिमा सजावट स्पर्धा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी 07 वाजता लहान मुलांच्या भाषणाचा व व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रेरणा मिळावी म्हणून पुस्तक वाटप करण्यात आले.
        सायंकाळी 5 वाजता शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, आरग यांची भव्यदिव्य मिरवणूक झाली. एकूणच सर्व कार्यक्रमाला आरगकरांनी भरपूर सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Santosh Mane SM News जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... आईच्या आईपणाला.. तिच्यातील बाईपणाला.. तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना.. त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना.. बायको नावाच्या अर्धांगिनीला.. तिच्यात दडलेल्या कारभारणीला.. संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला. दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला.. सख्या, चुलत, मावस बहिणीला.. बहिणी सारख्या प्रिय वहिनीला.. त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला.. माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला.. मावशी,आत्याला आणि मामीला.. त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला.. आज्जीच्या संस्कार सृष्टीला.. तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला.. घरच्या आणि शेजारच्या काकूला.. सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला.. मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या.. विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या.. भूत, वर्तमान, भविष्यकाळी रणरागिनींना.. तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा...

शिवरायांचा वारसा

Santosh Mane SM News Arag:   शिवरायांचा वारसा (खास दिपावलीच्या निमित्ताने)                        नदीचा उगमस्थान कुणी कुणी पाहिलाय. केवढा असतो हो नदीचा उगमस्थान. अगदी छोटासाच झरा असतो. हो ना? पण नदी किती मोठी असते. खूप मोठी असते ना! मग नदीचा उगम इतका छोटा आणि नदी एवढी मोठी! कसं काय बरं शक्य आहे? नदी मोठी असण्याचं एकच कारण आहे. कारण नदी स्वतःमध्ये अनेक झरे मिसळून घेते. अनेक छोटे-मोठे झरे मिसळून घेत-घेत नदी दिसेल त्या मार्गाने पुढे-पुढे जातच असते. मग त्या वाटेवर कुणी आडवं आलं तर ती त्यालाही सोबत घेते. जर सोबत नाही घेता आलं तर त्याच्या नादाला न लागता आपला मार्ग बदलते, माञ ध्येय नाही बदलत. अनेक अडचणींना सामोरे जात नदी शेवटी समुद्रामध्ये सामावते.         तसंच आपल्या मनातील विचारांचं आहे. आपल्या मनात शेकडो विचार घोळत असतात. काही चांगले तर काही वाईट. त्यातीलच एखादा चांगला विचार समाजामध्ये बदल घडवणारा असतो. त्या एका चांगल्या विचाराला योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली कि त्या विचाराचे एका चांगल्या संकल्...

महावितरण शेतीच्या लाईटचे बदललेले वेळापत्रक

संतोष माने SM News: नमस्कार शेतकरी बांधवांनो. .. महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे; मार्च 2018 करिता; राञी 11:55 ते सकाळी 09:55 सकाळी 09:55 ते सायं. 05:55 एप्र...