सांगली येथील शिवश्री राहुल रामचंद्र चव्हाण व इचलकरंजी येथील शिवमती स्नेहा अरविंद शेलार यांचा आज 14 मे 2019 रोजी छञपती संभाजीराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवधर्म पद्धतीने शिवविवाह सोहळा भिडे मंगल कार्यालय सांगली येथे पार पडला.
शिवधर्म पद्धतीने केल्या जाणार्या शिवविवाहात कोणत्याही प्रकारचा कर्मकांड केला जात नाही. हुंडा दिला वा घेतला जात नाही. अक्षता म्हणून तांदूळ वापरून त्याची नासाडी व अन्नाचा अपमान केला जात नाही. त्याऐवजी फुले देऊन नवदांपत्यास शुभ आशिर्वाद दिले जातात. अक्षता म्हणून जो तांदूळ पायाखाली तुडवून त्याची नासाडी होणार होती, तोच 40 किलो तांदूळ या नवदांपत्याच्या हस्ते अंधआश्रमाला दान देऊन आपले सामाजिक भान जपले.
या शिवविवाह सोहळ्यास आरग येथील शिवश्री गणेश पोपट पाटील व शिवश्री भास्कर पाटील यांनी शिवसेवक म्हणून काम पाहिले. शिवविवाहाची सुरूवात सामूहिक जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. शिवधर्म पद्धतीनुसार नवदांपत्याकडून शपथविधी करवून घेण्यात आला. मंगलाष्टका ऐवजी शिवअष्टका गायल्या.
अशा रितीने हा आगळावेगळा सोहळा आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
Follow Us On Our Social Links;
SM News, Arag YouTube Channel
https://m.youtube.com/channel/UCKjKWljm0HdnzCTSNtBVf-w
Facebook
https://www.facebook.com/santhosh.mane7652
Twitter
https://www.twitter.com/santhoshmane6
Instagram:
https://www.instagram.com/santhosh7652

https://santoshmane7652.blogspot.com/2019/05/blog-post_15.html
उत्तर द्याहटवा